Loading...

Dr. Rafiq Zakaria Campus, Post Box No 27, Dr. Rafiq Zakaria Marg, Rauza Bagh, Aurangabad 431001, Maharashtra, India

Album Images

Exploring Memories and Moments

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपण अंगीकारला पाहिजे- प्राचार्य डॉ.मजहर अहमद फारुखी औरंगाबाद-शहरातील मौलाना आझाद महाविद्यालय रोजाबाग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तिसाव्या नामविस्तार दिनानिमित्त आज एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ.रमेश औताडे मराठी विभाग प्रमुख संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मधील चांगल्या बाबींवर प्रकाश टाकला तसेच विद्यार्थ्यांसमोरील देखील आव्हने वर देखील विचार व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन निमित्त साजरा करण्यात येत असलेल्या पंधरवड्याचे उद्घाटन राज्यपाल नियुक्त विद्यापीठ अधीसभा सदस्य डॉ.अविनाश केंद्रे यांच्या हस्ते पंधरवाड्याचे उद्घाटन करण्यात आले.त्यांनी आपले स्वानुभव यावेळी विशद केले. अध्यक्षीय समारोप करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना प्राचार्य डॉ.मजहर फारुकी यांनी सांगितले की बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. कार्यक्रमाची सुरुवात प्रा.वकार नदवी यांनी कुराण पठणाने केली त्याचे मराठी भाषांतराचे वाचन प्रा.फेरोज पठाण यांनी केले. प्रा.उमर सरतापे यांनी मराठीत नात सादर केली. पाहुण्यांचा परिचय डॉ.सादिक अली यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बाळू गायकवाड यांनी केले आणि आभार प्रा.फेरोज पठाण यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.एम. ए.बारी उपप्राचार्य प्रा. शेख अब्बास,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती होती.

Browse through the beautiful moments captured in this album. Click on any image to view it in full size.

Back to Gallery

Explore More